(माननीय माजी नगरसेविका, नवी मुंबई महानगरपालिका, माजी आरोग्य समिती सभापती)
मी श्रीमती. वैशालीताई तुकाराम नाईक, यापूर्वी लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेविका या पदावर जबाबदारीने कार्य केले आहे. त्या कार्यकाळात जनसेवेलाच मी सर्वोच्च प्राधान्य दिले आणि प्रत्येक निर्णयात नागरिकांच्या हितालाच केंद्रस्थानी ठेवले. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना सेवा ही कर्तव्य नसून बांधिलकी आहे, हा दृष्टिकोन कायम जपला.
नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपल्या नंतर देखील माझा वडिलांनी (नाना) दिलेली शिकवण व वारसा जपत माझी सामाजिक जबाबदारी आणि जनतेप्रती असलेली निष्ठा कधीही थांबलेली नाही. कारण पद बदलू शकते, पण जनतेशी असलेले नाते हे निवडणुकीपुरते मर्यादित नसते; ते विश्वासावर उभे असते. हा विश्वास मी आजवर प्रामाणिकपणे जपला आहे आणि पुढेही जपत राहीन.
नगरसेविका म्हणून कार्यरत असताना मी विकासकामांना कधीही राजकीय चौकटीत अडकवले नाही. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिलांचे प्रश्न, आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रत्येक विषय संवेदनशीलता, सातत्य आणि जबाबदारीने हाताळला. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर प्रत्यक्ष काम करण्यावर माझा भर राहिला. मागील ५ वर्ष निवडणूक प्रक्रिया न झाल्याने महापालिकेवर प्रशासक असताना देखील प्रभागातील प्रश्न आयुक्तांकडे मांडून सोडविण्याचे काम जबाबदारीने केले.
माझा दृष्टीकोन म्हणजे — सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन, त्या सोडवण्यासाठी निस्वार्थीपणे कार्य करणे. माझे उद्दिष्ट हे स्वच्छ, सुरक्षित, शिक्षित, आणि सक्षम समाज घडवणे आहे.
समाजाच्या प्रत्येक घटकाचा सन्मान, प्रत्येक घरात समाधान आणि प्रत्येक गल्लीत विकास" हेच माझं स्वप्न आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र राहून, एक प्रगतीशील आणि प्रेरणादायी समाज निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.